सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर व जिल्हा अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर मध्य,शहर उत्तर या चार विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला शहर प्रमुख गुरुशांत धूत्तरगावकर,जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, उपजिल्हा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, प्रताप चव्हाण, संतोष पाटील, दत्तात्रय वानकर, संजय देशमुख, योगीराज पाटील, महेश धाराशिवकर, आनंद बुक्कानुरे, निरंजन बोद्दुल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आता शिवसंवाद अभियान टप्पा 2 राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बैठकीत नियोजन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी शिवसंवाद अभियानाची अधिक माहिती देताना आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची सर्व बाजूने तयारी आहे, आघाडी तर आघाडी अन्यथा स्वबळाची आमची तयारी आहे, मात्र सर्व निर्णय हे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील अशी माहिती दिली…पहा काय म्हणाले बरडे…

















