दक्षिण सोलापूर : होटगी जिल्हा परिषद शाळेची शालेय शिक्षण व्यवस्थापक समिती अध्यक्ष इंद्रजित लांडगे व उपाध्यक्ष मासुमा मौलाली नदाफ यांची एकमताने निवड झाली आहे.
यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी अतुल गायकवाड उपसंरपच असिम शेख, ग्रा प सदस्य संजय जाधव, काशिनाथ गंगदे , महातेंश पाटील, ग्रामसेवक बालाजी पाटील, केंद्र प्रमुख स्वामी सर मुख्याध्यापक अतिहळीकर , माजी अध्यक्ष अपण्णा कोळी, शालेय समिती सर्व सदस्य सिध्दलिंग भंडागे , विठल गायकवाड, सिध्दलिंग कोरे ,प्रशांत वाघमारे चंद्रकांत कुंभार, अंबिका डांगे ,राजश्री बंदिछोडे, रूपाली कोष्टी शरणाबाई कोळी, निलम्मा चिवडशेटटी, व शिक्षक वर्ग , इतर प्रमुख उपस्थितीत होते.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण चांगल्या प्रकारे मुलांना मिळावे, गावातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासह शाळेचा परिसर चांगला ठेवण्यावर भर राहील अशी ग्वाही नूतन अध्यक्ष लांडगे यांनी दिली.

















