सोलापूर : माजी आमदार तथा बाजार समितीचे संचालक दिलीप माने यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील फार्महाऊसवर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी महाविकासआघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक हे दोन्ही नेते एकत्रित बसून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा दूध संघाची मोट व्यवस्थित बांधत होते त्यांच्या निधनाने जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघावी हा या बैठकी मागचा उद्देश आपल्याच सांगण्यात आले. आगामी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघाची निवडणूक ही एकत्रितपणे येऊन लढवायची तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करून या माध्यमातून सर्व निवडणुका लढवायच्या असे या बैठकीत निश्चित झाले आहे.
मात्र या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणे आणि समन्वय ठेवण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल या दोन नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख हे सध्या राजीनामा देण्यास तयार नाहीत त्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर झालेली ही बैठक निश्चितच अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणारी आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे राजीनामा नाट्य मागच्या दोन दिवसांपूर्वी घडले या बैठकी आडून आमदार विजयकुमार देशमुख आणि काका साठे यांच्यावर दबावतंत्र वापरल जाणार का? असा ही प्रश्न चर्चेला आता चर्चेला आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.

















