सोलापूर : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या युक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपास AIMIM सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांनी शुक्रवारी सोलापूर आगार एसटी कर्मचाऱ्यांच्या दुखामध्ये सामील होऊन त्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता.
येणार्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने AIMIM सदैव ठामपणे उभी राहिल अशी ग्वाही देत फारूख शाब्दी यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते, त्या ग्वाहीनुसार हाजी फारूख शाब्दी यांच्या वतीने नगरसेवक अहजर हुंडेकरी यांच्या उपस्थित मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना फूड किटचे वाटप करण्यात आले.

















