सोलापूर : आगामी जिल्हा परिषद,जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजीनामा नाट्य असेल की बाजार समिती गैरव्यवहार प्रकरण चौकशी च्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांच्या तिऱ्हे गावातील फार्म हाऊसवर हुरडा पार्टी निमित्ताने राजकीय खलबते झाली.
आगामी डीसीसी व दूध संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यात समन्वय आणि नेतृत्व निश्चित करण्यात आले. ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे देण्यात आले. आमदार संजयमामा शिंदे यांना मात्र विसरू नये याचीही आठवण करून देण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कायम रहावी अशी भाषा होत असताना तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नव्हते.
सोमवारी काका साठे जिल्हा परिषदेत आले असता पत्रकारांनी त्यांना या बैठकीवर पत्रकारांनी छेडले, यावर बोलताना मी या लोकांना चालत नाही, जिल्हा बँक आणि दूध संघाच्या यादीत मी नाही.अशी प्रतिक्रिया दिली.
बाजार समिती सभापती व संचालक मंडळाच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी लागली आहे हे सर्व सभापती राजीनाम्यासाठीच सुरू आहे ना?असा प्रश्न केला असता सभापती पदावर मालकच राहतील असे उत्तर येताच कोणते मालक असा प्रश्न आला असता त्यांनी जाणीवपूर्वक विजयकुमार देशमुख असे नाव घेतले. काका साठे यांच्या बोलण्यावरून दिलीप माने यांच्यावरही नाराजी अजूनही स्पष्ट दिसत होती.
















