सोलापूर : राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाहता तिसऱ्या लाटेकडे राज्य जात असल्याचा चित्र दिसत आहे. मोठ्या झपाट्याने कोरोना चा संसर्ग वाढत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
बुधवारचा आकडा पाहिला तर निश्चित धक्का बसेल सोलापूर शहरांमध्ये तब्बल 133 कोरोनाचे रुग्ण आढळून आले, यामध्ये 36 पॉझिटिव्ह रुग्ण हे केवळ सिव्हील हॉस्पिटल मध्ये काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सिव्हिल सूत्रांकडून अधिक माहिती घेतली असता सिव्हील हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी कुणाचीही प्रकृती गंभीर नाही सर्व सुरक्षित आहेत काही जणांना सिव्हिल मध्ये ऍडमिट करण्यात आले असून काही जण होम आयसोलेट आहेत. तर ग्रामीण भागामध्ये तब्बल एकशे 42 नवीन रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये एका बार्शीत 43 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पहा बुधवारची शहर व जिल्ह्यातील आकडेवारी पुढीलप्रमाणे
















