सोलापूर : जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय खताळ यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे,माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, महेश कोठे, दिलीप कोल्हे यांची उपस्थिती होती. सोलापुरात हॉटेल सुर्या याठिकाणी हा प्रवेश कार्यक्रम झाला. लांबोटीचे खताळ कुटुंबीय हे मोहोळ मधील डोंगरे गटाचे समर्थक असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला ज्येष्ठ नेत्यांची गर्दी होती.
यावेळी प्रवेशावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवेशाचे खापर मोहोळच्या पत्रकारांवर फोडले, माझी इच्छा भाजपमध्ये जाण्याची नव्हती, मात्र बळजबरीने पद दिले, माझे वडील स्वर्गीय तानाजी खताळ यांची इच्छा ही राजन मालक यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची होती अशी माहिती अक्षय खताळ यांनी दिली पहा ते काय म्हणाले,

















