सोलापूर : कार्यालयीन कामकाजामध्ये दारू पिऊन अर्वाच्च भाषेत गोंधळ घातल्या प्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ श्रेणी लिपिकास आयुक्त पी शिवशंकर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. गुरुवार 13 जानेवारी रोजी आयुक्त शिवशंकर यांनी हा आदेश काढला.
ज्याअर्थी एस. एन. गदवालकर, व.श्रे. लि.वि.का.क्र.05 हे दि. 13/01/2022 रोजी कार्यालयीन कामकाजामध्ये मदयपान करुन कार्यालयात अर्वाच्य भाषेत गोधंळ घालीत असल्याचे विभागीय अधिकारी यांनी कार्यालय अधिक्षक, सा.प्र.वि. यांना दुरध्वनीवरुन माहिती दिली. त्यावरुन कार्यालय अधिक्षक साप्रवि व तपासणी अधिक्षक, अलेप यांनी दि. 13/01/2022 रोजी दुपारी 4.45 वाजता प्रत्यक्ष विभागाय कार्यालय येथे तपासणी केली असता, विभागीय अधिकारी यांची माहितीनुसार श्री एस. एन. गदवालकर यांनी मद्यपान केलेचे निर्दशनास आले. दरम्यान आयुक्त यांनीही प्रत्यक्ष पहाणी करुन श्री गदवालकर यांना वैद्यकिय तपासणीकरीता संबंधित विभागा कडे पाठविण्यात आले.
ज्याअर्थी श्री.एस.एन. गदवालकर, व.श्रे. लि. यांच्या कडे विभागीय कार्यालय क्रं.5 कडे वश्रेलि या पदाचे कामकाज सोपविणेत आलेले असताना दि. 13/01/2022 रोजी त्यांचे कडे सोपविण्यात आलेले कामकाजाची तपासणी केली असता त्यांनी वर्कशिट ठेवले नसल्याचे आढळून आले. त्याच प्रमाणे प्रशासनाकडून वेळोवळी दिलेल्या आदेशानुसार गुगल कॅलेंडरचा वापरकरुन नोंद ठेवणे आवश्यक असताना, त्यानुसारही श्री गदवालकर यांनी गुगल कॅलेंडरचा वापर करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांचे दफ्तर तपासणी करीता कपाट उघडणेस सांगितले असता त्यांनी कपाटाची किल्ली जवळ नसून ती घरी ठेवली असल्याचे समक्षतेत सागितले. तसेच मस्टर तपासणी केली असता, मस्टरवर स्वाक्षरीकरुन घरी जात असल्याचे विभागीय अधिकारी यांनी समक्षतेत सांगितलेले आहे.
ज्याअर्थी श्री.एस.एन. गदवालकर, व.श्रे. लि.वि.का.क्र.05 यांनी वर्कशिट न ठेवणे, केलेल्या कामकाजाचे दस्तोवज उपलब्ध करुन न देणे तसेच गुगल कॅलेडरचा वापर न करणे असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) 1979 चे नियम 3 (1) (एक व दोन) 3 (2) च्या तरतुदीचा भंग केला आहे. तसेच कार्यालयीन वेळेत मद्यपान करुन उक्त अधिनियमातील नियम क्रं. 28 (ब) च्या तरतुदीचा भंग केला असून त्यास सर्वस्वी श्री. एस. एन. गदवालकर, व.श्रे. लि, हे जबाबदार आहेत. त्यांचे वरील गैरवर्तनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतुदीनुसार त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित असून, त्याबाबत अधिक चौकशी करणे गरजेचे आहे. सदर चौकशीस बाधा येऊ नये म्हणून श्री. एस. एन. गदवालकर, व.श्रे. लि. वि. का.क्र. 05 यांना निलंबनाधिन ठेवणे आवश्यक आहे.
2) ज्याअर्थी सोलापूर महानगरपालिका सेवक व अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम वेळोवळी झालेल्या बदलासह लागू करण्याचे मा. महानगरपालिका सभा दि.02/03/1982 विषय क्र. 399 ठराव क्र. 399 अन्वये निर्णय झालेला आहे.

















