सोलापूर : महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्री फुलाबाई चंदनशिवे यांचे गुरुवारी निधन झाले. स्वतः फुलाबाई या सोलापूर महापालिकेत अनेक वर्षे सेवा केली आहे. त्याच बरोबर त्यांचे चिरंजीव नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचं शहर आणि जिल्ह्यात मोठं वलय आहे. त्यांच्या माणुसकीची प्रचिती आली ती अंत्ययात्रेला. गुरुवारी त्यांची अंत्ययात्रा मिलिंद नगरातून पुणे नाका परिसरात निघाली. या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय उसळला.
यावरून त्यांना मानणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज आला.
दरम्यान महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अंत्यसंस्काराच्या विधीसाठी जास्तीत जास्त 20 लोक मर्यादा निश्चीत केली असताना व त्याबाबत त्यांना सुचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करून २० पेक्षा जास्त लोक गोळा करून अत्यंविधी केली आहे व कोरोना संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने सोशल डिस्टसींग न ठेवता नमुद आदेशाचे उल्लघंन केले आहे तसेच इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे.म्हणून फौजदार चावडी पोलिसांनी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गौतम चंदनशिवे व अनिल चंदनशिवे या तीन भावांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


















