सोलापूर- आकाशवाणी केंद्र लगत असलेल्या रस्त्याच्या बाजूला घाणीचा साम्राज्य वाढत असताना तो स्वच्छ रहावा व त्या जागेचा योग्य वापर व्हावा ह्या हेतून मनसे उपशहरप्रमुख पवन ईरण्णा देसाई यांच्या संकल्पनेतून आणि हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन च्या सहकार्याने मकरसंक्रांत दिनाचे अवचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सोलापूर मनपा सभागृह नेता शिवानंद पाटील यांनी त्या वृक्षासाठी ट्री गार्डची व्यवस्था करून दिले. सदर ठिकाणी स्वच्छता व त्या झाडांना संगोपन करण्याचा निर्धार त्या वेळी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष- प्रशांत इंगळे, सभागृह नेता शिवानंद पाटील, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, ईरण्णा देसाई, आकाशवाणी कार्यक्रम विभाग प्रमुख- राजेंद्र दासरी,सिद्धेश्वर गड्डम आदींची प्रमुख उपस्थिती होती व या उपक्रमात श्रीशैल होळीकट्टी, तिप्पना चंदा, अमरनाथ शिंदे, राजेश गाजुल, अशोक गोब्बूर, डॉ. विश्वनाथ आडम, बसवराज सावळगी, किरण सिदमल, शिवानंद बळूरगी, गोविंद बंदपट्टे, आनंद तरटे, पोलीस हवालदार शंकर याळगी, पंडित बालगावकर, अनिल गोब्बूर, बोगार सर, कैलास पाटील, गुरू धुत्तरगी, भिमाशंकर बाळगावकर, सतीश दंतकाळे, सिद्धू लोखंडे, पप्पू कांबळे, सागर शिंदे, बलराम कोतलापुरे, सागर ढगे, रशीद शेख, शिवा नडगेरी, मुरली रासकोंडा, सिद्धराम खजूरगी, सुनील अरळीकट्टी, नरेंद्र क्षीरसागर, राहुल गंधुरे, गजानन केंगनाळकर, महेश नल्ला आदी उपस्थित होते.
तर यावेळी सुमित अंबुरे,रुपेश बरड, गौरव शिंदे,आकाश शिंदे, शिवराज पुरवंत, गणेश लिंबोळे, सागर नवले, बसवराज जमखंडी, सिद्धराम निंबाळ, प्रभाकर कल्लूर, किरण देसाई, श्रीकांत होळीकट्टी, निलेश गडेप्पा, कुणाल अलकुंटे, मनोज पिसे, पांडुरंग आडम, विनोद देवकर, नागेश दाते, कुमार आलूरे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.


















