दक्षिण सोलापूर | होटगी स्टेशनच्या विकासात गटविकास अधिकार्यांच्या अडथळा होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यासह सदस्यांनी उपोषणाचा इशारा दिला.दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या विकासासाठी कर’ आकारणी गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील कंपन्यांकडून कर आकारणी भरली नाही. कर आकारणी भरावी व ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावी, अशी मागणी सरपंच जगन्नाथ गायकवाड आणि अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत केले.
अनेकवेळा गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील एकही कायमस्वरूपी ग्रामसेवक दिला नाही. तसेच कर भरण्यासाठी कंपन्यांना पत्रव्यवहार करून देखील आणखीन हे कर जमा झाला नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याऐवजी कंपन्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोप सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. तसेच याबात राज्याचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेदेखील पत्रव्यवहार केला असून त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी शिफारस केली आहे. आणखीन देखील या संदर्भात कारवाई केली नाही. यासंदर्भात कारवाई करावी अन्यथा दक्षिण सोलापूर पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी केला आहे.
होटगी स्टेशन ग्रामपंचायत परिसरामध्ये अनेक सिमेंट कंपन्या आहेत. परंतु वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील या कंपनीने आजतागायत ग्रामपंचायत कर भरला नाही. याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कर भरण्यासाठी कंपन्यांना प्रवृत्त करावे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य, होटगी स्टेशन निसार कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निसार कांबळे, फातिमा शेख, मीनाताई कोरे, गायञी ठक्के, निलम भोसले, अश्विनी कडचे यांच्यासह कुणाल ठक्के, लक्ष्मण भोसले,विजय कडचे आदी उपस्थित होते.


















