पंढरपूर | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूर प्रांत अधिकारी गजानन गुरव यांची तक्रार थेट विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे. तीन तीन पदभार असताना पुन्हा पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक पद का? असा प्रश्न उपस्थित केला असून त्यांचा प्रशासक पदभार काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४० (१) अन्वये ३० डिसेंबर २०११ रोजी मुदत संपत असून आपण पंढरपूर नगरपरिषद चा कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून यांची आपण पंढरपूर प्रांत अधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे
सदर आपण नियुक्त करण्यात आलेले अधिकारी यांच्या कडे पंढरपूर तालुका प्रांत अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवसाथपक, तसेच मोहोळ भूसंपादन अधिकारी इत्यादी कडील पदभार असून त्यांच्या भूसंपादन चे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच पंढरपूरच्या नागरिकांचे मनस्थिती या अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे.


















