त्याला नंतर ग्रामीण पोलिसांनी गुरुनानक चौकातील तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेले तिथे रात्री बराच वेळ विशाल फटे याची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणी साठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते.
सोमवारी दुपारी सोलापूर शहरातील एका इमारतीतून त्याने युट्यूब वर व्हिडीओ बनवून तो स्वतः शेअर केला आणि आपण रात्री पोलिसात हजर होणार असल्याचे सांगितले होते.


















