सोलापूर : मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण सध्या चांगलेच पेटले आहे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या मालक शाहीला सुरुंग लावण्यास सुरू केली आहे. मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत तात्या माने हे मालक प्रेमी असल्याने ते सुद्धा उमेश पाटील यांच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे.
मोहोळ तालुक्याच्या क्रीडासंकुलावरून आता आमदार माने आणि उमेश पाटलामध्ये राजकीय शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतं.
दरम्यान उमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोहोळ तालुक्यातील विविध आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर बैठका लावल्या यामध्ये मोहोळ तालुक्याच्या क्रीडा संकुलाचा विषय सुद्धा घेण्यात आला. या बैठकीला आमदारांनी अवश्य यावे, प्रशासनाकडून त्यांना बैठकीसाठी निमंत्रण जाईल मी स्वतः त्यांना निमंत्रण देईन असे पाटील म्हणाले होते.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका सुरू झाल्या, त्या बैठका रात्री सात वाजेपर्यंत सुरू होत्या, यामध्ये मूळ क्रीडा संकुलाचा विषयी आला.
दरम्यान आमदार यशवंत माने यांनीही या बैठकांना उपस्थिती लावली. जेव्हा यशवंत माने बैठक संपवून खाली आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना क्रीडा संकुलाच्या विषयी विचारले असता बैठक ही नियमाची आणि कायदेशीर नव्हती असे सांगून उमेश पाटलांना शह देण्याचा प्रयत्न केला आणि नाम मात्र बैठक असल्याने नाईलाजाने मला या बैठकीला बसावे लागले.
बैठकीनंतर या विषयावरच उमेश पाटील यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी घेतली असता त्यांनी स्वत:ला सावरत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माथी खापर खापर फोडले. पहा हा व्हिडीओ

















