सोलापूर : सकाळच्या सुमारास एक महिला आपल्या दारासमोर रांगोळी काढत असतानाच दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी तिला पत्ता विचारत तिच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
दिपाली सचिन लोकरे वय ४८, राहणार भाग्यलक्ष्मी निवास, राजस्व नगर विजापूर रोड, यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी ही नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घराच्या दारासमोर रांगोळी काढत असताना एक काळ्या रंगाची मोटार सायकल त्यावरून दोन अनोळखी इसम मोटार सायकल थांबवून त्यांच्या हातातील एक चिठ्ठी फिर्यादीसमोर धरून म्हणाला,
अॅन्टी अॅड्रेस सांगा असे म्हणताच लोकरे यांनी चिट्ठी पाहताच त्यांच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याच्या गंठणला हिसका मारून जबरदस्तीने तोडून चोरून घेऊन गेले.
याप्रकरणात एक अनोळखी इसम, २) दुसरा अनोळखी इसम अंदाजे वय २४ वर्ष, अंगाने मजबूत असलेला उंची ५ फुट ४ इंच रंगाने गोरा, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातलेला व तोंडाला मास्क लावलेला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















