सोलापूर : पूर्वाश्रमीचे काँग्रेस तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
खरटमल यांनी आपल्या सुधीर गॅस एजन्सीच्या कार्यालयात सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. सुधीर खरटमल यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला तेव्हापासून ते काँग्रेसच्या लांब गेले मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्यावरील प्रेम तसेच कायम आहे, खरटमल हे सर्व कार्यकर्त्यांना भेटतात त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश असतो.
सोमवारी सुधीर खरटमल यांच्या वाढदिनी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर संजय हेमगड्डी, सुनील रसाळे, एन के क्षीरसागर, हाजीमलंग नदाफ, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे,चंद्रकांत कोंडगुळे यांच्यासह नगरसेविका श्रीदेवी फुलारे, पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, शब्बीर नदाफ, यांच्यासह असंख्य लोकांनी शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी जी गर्दी होते ती गर्दी यंदा नेत्यांच्या भीतीने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते न आल्याने कमी प्रमाणात दिसली परंतु अनेकांना अपेक्षा नव्हती मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छाचा आनंद सुधीर खरटमल यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
सुधीर गॅस एजन्सी कार्यालयात खरटमल यांचे चिरंजीव हर्षल व त्यांच्या पत्नी तसेच नातीने सुध्दा शुभेच्छा दिल्या. आपली छोटी नात कार्यालयात आल्याने बराच वेळ खरटमल हे तिच्यात गुंतल्याचे दिसून आलं.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत खरटमल यांनी वैराग मध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली त्या ठिकाणचे नेते निरंजन भुमकर यांनी अनेक समर्थकांसह येऊन खरटमल यांचा वाढदिनी सत्कार केला.


















