Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा ‘ऑक्सिजन’ने स्वयंपूर्ण ; आता जिल्हा ‘लसवंत’ करण्यासाठी युवकांनो सहकार्य करा ; पालकमंत्री भरणे यांचे प्रजासत्ताक दिनी आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर : भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील शासकीय मैदानावर मैदानावर शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. पालकमंत्री भरणे यांचे नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्यालयाच्या मैदानावर आगमन झाले, त्यानंतर नऊ वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्री भरणे यांनी उपस्थितांसमोर संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली….


उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री भरणे म्हणाले मागील दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे संकट आहे मात्र सोलापूरच्या प्रशासनाने या दोन्ही लाटेला यशस्वीपणे तोंड दिले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये 23 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती.  सध्या तिपटीने ऑक्सिजन मुबलक असून जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण झाला हे  अभिमानाची बाब आहे मात्र अद्यापि शहर जिल्ह्यातील पाच लाख नागरिकांनी लस घेतली नाही. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरीकांचा सर्वाधिक समावेश आहे. या युवकांनी लसीकरण करून जिल्हा बसवंत करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे विशेष कौतुक करताना मागील वर्षभरात जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, माझे गाव कोरूना मुक्तगाव या अभियानाची दखल राज्य सरकारने घेतली. माझे बालक माझी जबाबदारी हा उपक्रम राबवताना जिल्ह्यातील नऊ लाख बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना सुरक्षित केले, स्वच्छ व सुंदर शाळा हे उपक्रम राबवत तब्बल नऊ कोटी लोकसहभागातून शाळा स्वच्छ व सुंदर केल्या, आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मी सुरक्षित, माझे गाव सुरक्षित हे अभियान सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केलेले आहे. यानुसार कृषीपंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून, थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेला नागरिकांना पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी 28 कोटी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 33 कोटीचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याच्या इतर नागरी भागासाठीही त्यांच्या मागणीनुसार निधी मंजूर करून नागरी भागाच्या विकासाला चालना देण्यात येत आहे. यावर्षी वन विभाग शहरासह पालखी तळाजवळ मियावाकी पद्धतीने रोपवन लागवड करणार आहे. सिद्धेश्वर वनविहार येथे प्रथमच वन्यजीवांसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहे. 400 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड केली जाणार असून 34 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन सोलापुरात पार पडले, असे श्री भरणे यांनी सांगितले.

ग्रामीण पोलीस दलाने राबविलेल्या हातभट्टी मुक्त जिल्हा करण्यासाठीच्या मिशन परिवर्तनचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले, महापालिकेने राबविलेल्या  माझी वसुंधरा अभियानाने अतिशय चांगले काम केले, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक संकलन,  सायकल रॅली, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा असे सुमारे 400 उपक्रम राबविले.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : जिल्हा परिषदेत अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Next Post

सोलापूर : महेश कोठे यांची गाडी जोरात आहे राव, मामांकडून कौतूक तर सपाटेंनी जोडले हात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : महेश कोठे यांची गाडी जोरात आहे राव, मामांकडून कौतूक तर सपाटेंनी जोडले हात

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979130
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group