Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंच्या फिरदोस पटेल यांना ‘हॅटट्रिक’साठी शुभेच्छा,”टॉप थ्री” नगरसेवक म्हणून केला गौरव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


“महापालिका निवडणुकीत या वेळेस चार नव्हे तर तीन नगरसेवक असतील हे लक्षात ठेवा. ताई माई अक्का, विचार करा पक्का ,”हाता”वर मारा शिक्का ! हे जुने विसरू नका, असे सांगत  लोक पाच वर्षातून एकदाच येऊन आपली दिशाभूल करतील. कामाच्या नव्हे तर जातीच्या आधारावर मते मागतील, त्यांना धडा शिकवा, असे आवाहनही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना केले”





सोलापूर  : प्रभागाच्या विकास कामात अग्रेसर असलेल्या फिरदोस पटेल सोलापूर महानगरपालिकेच्या  “टॉप थ्री” नगरसेवकांपैकी एक नगरसेवक असतील, असे सांगत नगरसेविका फिरदोस पटेल यंदा विकास कामांच्या जोरावरच हॅटट्रिक करतील असा ठाम विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक १६ मधील कॅम्प प्रशाला ते गांधीनगर पर्यंत रस्त्याच्या बाजूला ३५० मीटर लांबीचा मॉडेल रस्ता तयार करून तो “स्मार्ट वॉकिंग ट्रॅक “सह सुसज्ज करण्याच्या कामासह फलटण मस्जिद ते तस्वीर फोटो स्टुडिओ ₹पर्यंत डांबरी रोड करणे, विविध ठिकाणी एलईडी लाईट बसविणे, आकर्षक बाकडे बसविणे ,रंगरंगोटी तसेच झाडे लावणे अशा सुमारे ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी नगरसेविका फिरदोस पटेल, शशिकांत कलबुर्गी सर, सोहेल शेख, किशोर भोसले, मुंढे सर, शौकत पठाण, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या नगरसेवकांपैकी फिरदोस पटेल या टॉप थ्री नगरसेविका असतील ज्या  खूप चांगलं काम करत आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना मिळणारा सपोर्ट चांगला आहे. हेच यावरून सिद्ध होते,की तुमचं काम हे खूप चांगल्या पद्धतीत तुम्ही करत आहात. ५० लाखाच्या विविध विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक १६ चा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोलापुरात सध्या जी काही कामे सुरू आहेत ,ती केवळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच सुरू आहेत, हे कोणालाही नाकारून चालणार नाही. 

आपण मला तीनवेळा आमदार म्हणून निवडून आणलं. मी किंवा शिंदे साहेबांनी जात-पात, समाज कधीच वापरला नाही. पण केवळ कामाच्या आधारावर तुम्ही काँग्रेसला आणि आम्हाला साथ देतात. तुम्ही किती हुशार आहेत हे दिसून येते. यावेळेस वेळेससुद्धा काँग्रेसला विसरू नका. काँग्रेस उमेदवार दिसला की मार शिक्का हेच लक्षात ठेवा. नगरसेविका फिरदोस पटेल तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक करतील यात तिळमात्र शंका नाही. त्यांनी अशीच कामाची पद्धत सुरू ठेवावी अशी देवाचरणी प्रार्थना करते. आम्ही शेवटपर्यंत तुमचं काम करत राहू ,कधी  कमी पडणार नाही, सदैव काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहोत , असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.


याप्रसंगी मौलाली शेख, अखलाक शेख ,मुन्ना वळसंगकर, सादिक शेख, खान चाचा ,आरेफा शेख, फरहीन चौधरी, शेख बेनझीर, मोहम्मद सादिक, नाजनीन कोरबु ,शहनाज सय्यद, मनीषा उडाणशिव ,रजिया जमादार, आशा सदाफुले ,नाझेरा पठाण ,मुमताज गौर, स्वाती आवारे, उषा कसबे, हमिदा पठाण यांचीही उपस्थिती होती .

 कॅम्प प्रशाला ते गांधीनगरपर्यंत मोठा रस्ता आहे .या रस्त्याची लांबी ३५० मीटर असून या रस्त्यावर एका बाजूला ८ फूट रुंदीचा वॉकिंग ट्रॅक करण्यात येणार आहे. यावरून दररोज या परिसरातील नागरिक वॉकिंग करू शकणार आहेत .तसेच ट्रॅकला सुरक्षेच्या दृष्टीने रीलींग करण्यात येणार आहे .तसेच दोन्ही बाजूला विविध पानाफुलांची सुशोभित झाडे लावण्यात येणार असून ठीकठिकाणी आकर्षक लाइट्स बसविण्यात येणार आहेत. तसेच ज्येष्ठ मंडळींसह फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था म्हणून आकर्षक बाकडेसुद्धा बसविण्यात येणार  आहेत. सोलापूर शहरातील प्रभागातील हा “पहिलाच पायलट प्रोजेक्ट “असेल असा दावा नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केला आहे. 



———————————

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | आ.संजयमामांनी लावला जोर | अजितदादा म्हणाले, अरे मी काय खिशातलं देऊ का? काय सौदा चालू हाय काय?मजेदार व्हिडीओ आला समोर

Next Post

ब्रेकींग न्यूज : जोडभावी पेठेत घरात चालत होता कुंटणखाना | पोलिसांनी टाकला असा छापा | एका महिलेची सुटका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग न्यूज : जोडभावी पेठेत घरात चालत होता कुंटणखाना | पोलिसांनी टाकला असा छापा | एका महिलेची सुटका

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979128
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group