सोलापूर : जेबी सोशल ग्रुपचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे युवक नेते वाहिद बिजापूरे यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 17 मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते प्रारंभी ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली…
यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मदरशांमधील मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगरसेवक हाजी तौफीक हत्तूरे, जुबेर कुरेशी, रफीक चकोले, डॉ रफीक सय्यद, दाऊद मुजावर, बिस्मिल्लाह शिकलगार, हसन जमादार, हाजी अफजल पठान, गणेश डोंगरे, मुर्तुज कुरेशी, रहमान मडकी, इरफान सर, इलियास डंके, शोहेब मागामी, अय्यूब बागवान, हाजी जैनोद्दीन नदाफ, आमीन नदाफ, बख्तियार मुजावर, जैनिद्दीन शेख, हुसैन कलबुर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती.


















