मोहोळ : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच सध्या जुंपली आहे. जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी मालकशाहीला सुरुंग लावला आहे. मोहोळ तालुक्यातील क्रीडा संकुलावरून आमदार यशवंत माने यांना ही उमेश पाटील यांनी डिवचले आहे, त्यामुळे आता आमदार यशवंत तात्या आणि उमेश पाटील यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे. याच सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्या फार्महाऊसवर हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत, पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती
यावेळी पत्रकारांनी आमदार यशवंत माने यांना मोहोळ तालुक्यातील पेटलेल्या राजकारणावरून छेडले असता सुरुवातीला त्यांनी पत्रकारांची फिरकी घेतली कुठे गरम आहे, थंडी तर एवढी वाढलीय की टेम्परेचर 9 वर आलंय की, असे म्हणतात तात्या राजकीय वातावरण…उमेश पाटलांनी तर क्रीडा संकुलावरून तापवलंय की, कुठलं काय शांत झालं की, मुळात रमेश बारसकर यांची जागा संकुलाच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. कोळेगाव जवळील एक आणि नगरपालिकेची एक जागा निवडण्यात आली आहे. बारसकर यांची ही जागा पर्याय ठेवण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस साठी या वातावरणात चॅलेंजिंग असणार आहे की असा प्रश्न येताच अजिबात नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता येणार कोण कितीही आपटू दे असे म्हणून नकळत त्यांनी पक्षातील विरोधकांना घरचा आहेर दिला.


















