पंचायत समिती उत्तर सोलापूर येथे 73 वा प्रजासत्ताक दिन सभापती रजनी भडकुंबे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून उत्साहाने साजरी करण्यात आला.यावेळी रजनी भडकुंबे यांनी उपस्थिताना भारतीय संविधानाचे महत्व सांगितले व सर्वांकडून तंबाखू व्यसन मुक्तीचे शपथेचे वाचन करून घेतले.
या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, तालुका आरोग्य अधिकारी शेगर, उप अभियंता मुनाफ आडते, गटशिक्षणाधिकारी बापुराव जमादार, माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकणीं, कनिष्ठ प्रशासनाधिकारी राजेश देशपांडे,सहाय्यक लेखाधिकारी संजय पाटील, विस्ताराधिकारी अमोल तोडकरी, सुरेश राठोड, आदी अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यासाठी नंदकुमार तोडकर, लता बनसोडे, अर्जुन दळवी सर, किरण शिंदे, साजन काळे, सावित्री अळकुंटे,यांनी विशेष परिश्रम घेतले.


















