सोलापूर : सत्तरफूट रोड, कुमठा नाका सोलापूर येथे चंद्रकांत मनोहर देवकते यांच्या घराला आग लागून घरातली सर्व साहित्य जाळून खाक झाल्याची माहिती एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांना फाउंडेशनचे संचालक गुंडुराव केंगनाळकर आणि रमेश कलशेट्टी यांनी दिली.
देवकते कुटुंबाची परिस्थिती सामान्य असून मोलमजुरी करून उपजीविका करत आहेत. अचानकपणे लागलेल्या आगीने या गरीब कुटुंबाची उभी असलेली संसार आगीत राखरांगोळी झाली.
संसार पुन्हा कसे उभी करावी हा गंभीर प्रश्न देवकते कुटुंबासमोर असताना या परिवाराला सामाजिक जाणिवेतून मदत व्हावी,यासाठी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी संसार उपयोगी साहित्यांची मदत केली.
एम.के.फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत शेळगी,आहेरवाडी,माळकवठे,भंडारकवठे येथे जळीत कुटुंबाला संसार उपयोगी साहित्यांची मदत करण्यात आली आहे.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे,सोलापूर महानगर पालिकेचे सभागृह नेते शिवानंद पाटील,नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर,सुनील पाताळे, मीराताई घटकांबळे,कल्लप्पा हंगरगी,मल्लिकार्जुन धारसंगे,राजशेखर सगरे,शिवा होसाळे,कल्लप्पा आहेरवाडी,चंद्रकांत दिशेट्टी,मल्लेशी मंदोली,सिद्धाराम बिराजदार, रवि हलकुडे,भागण्णा पुजारी,काशीम शेख,दीपक घागरे, महेश दंतुलवार, नागनाथ तोरणगी, अशोक अरळीमार,संतोष दिंडुरे,कपिल घागरे,अप्पाशा हंचनाळ,निलकंठाय्या स्वामी, रेवनसिद्ध भैरामडगी आदी उपस्थित होते.

















