Wednesday, October 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचे कोरोना बाबत नवे आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : राज्य सरकारच्या टास्क फोर्स बैठकीनंतर राज्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर शहर हद्दीतील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश गुरुवारी दुपारी काढले.

ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून, महानगरपालिका आयुक्त हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.


ज्याअर्थी, ओमिक्रॉन कोविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणुचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने शासनाकडील संदर्भ क्र. ७ अन्वये कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी साथ रोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. तथापि लसीकरण झालेल्या प्रभावी कामकाजाच्या अनुषंगाने सदर निर्बंधामध्ये शासनाकडील दिनांक ३१/०१/२०२२ च्या आदेशान्वये अंशतः सुट देण्यात आलेली आहे.


त्याअर्थी, मी पि. शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना (कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर शहर हद्दीत दि.०३/०२/२०२२ रोजी रात्री ००.०० पासून खालीलप्रमाणे निर्बंध लागू राहतील.


१. ऑनलाईन तिकीटाची सुविधा उपलब्ध असलेले सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार खुली राहतील. तथापि सर्व अभ्यागतांचे लसीकरण (दोन मात्रा) पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर ठिकाणावरील संबधीत नियंत्रण अधिकारी यांनी अशा ठिकाणी एका वेळेस भेट देणा-या अभ्यांगतांची संख्यावर नियंत्रण ठेवणेकामी योग्य ते निर्बंध ठेवण्यात यावे.


२. ऑनलाईन तिकीटाची सुविधा उपलब्ध असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेनुसार खुली राहतील. तथापि सर्व अभ्यागतांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर ठिकाणावरील संबधीत नियंत्रण अधिकारी यांनी अशा ठिकाणी एका वेळेस भेट देणा-या अभ्यांगतांची संख्यावर नियंत्रण ठेवणेकामी योग्य ते निर्बंध ठेवण्यात यावे.


३. ब्युटी पार्लर व केश कर्तनालय यांना लागू केलेल्या निर्बंधाप्रमाणे स्पा सेंटर ५०% क्षमतेसह चालू राहतील.


४. अंत्यसंस्कार / अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरील निर्बंध शिथिल करण्यात येत आहे.


वरील शिथिल केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त इतर मुद्यांबाबत यापूर्वी या कार्यालयाचे दिनांक ०९/०१/२०२२ च्या आदेशान्वये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : ‘सत्यवाना’ तुझी शिक्षा मला का रे बाबा..,चोर सोडून संन्याशीच सापडला

Next Post

सोलापूर : थोबडे वस्तीतला ‘प्रेम’ पोलिसांच्या बेड्या सोडून पळाला | ‘Prem’ from Thobde Vasti escaped from the clutches of the police

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : थोबडे वस्तीतला 'प्रेम' पोलिसांच्या बेड्या सोडून पळाला | 'Prem' from Thobde Vasti escaped from the clutches of the police

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003103
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group