सोलापूर : हाणामारीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र पोलिसांची नजर चुकवून तो पळून गेल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
प्रेम संजय हलकवडे वय १९ वर्षे राहणार थोबडे वस्ती, देगाव नाका, सोलापूर असे पाळलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक सुधीर मारूती पवार पोलीस मुख्यालय यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी प्रेम याच्यावर सलगरवस्ती पो.स्टे येथील भादवि ३०७,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्यात अटक असून जिल्हा कारागृहात होता. आजारी असल्याने त्याला सिव्हील हॉस्पिटल मधील बी ब्लॉक वॉर्ड नं २९ मध्ये अंतरुग्ण म्हणुन दाखल केले होते. 2 फेब्रुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यास लावलेल्या हातातील बेडीतील हात काढून जात असताना त्यास पकडण्यासाठी फिर्यादीने आरोपीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने फिर्यादीस जोराचा झटका मारून सिव्हील हॉस्पीटलचे वॉल कंपाऊडचे भिंती वरून उडी मारून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला आहे. तपास सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे हे करत आहेत.
















