Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या शहरातील रक्तपेढ्याना सक्त सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.3: जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे रक्त संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्तसाठा कमी पडत आहे. खाजगी आणि शासकीय ब्लड बँका, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठ यांनी रक्तसंकलन करून यातील 10 टक्के रक्तसाठा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाला (सिव्हील हॉस्पिटल) द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी एस.पी. कुलकर्णी, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. अबिद पटेल, सुनिता गायकवाड यांच्यासह एआरटीचे सर्व वैद्यकीय अधिकारी, समितीचे सदस्य, सामाजिक संस्था, ब्लड बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एडस संसर्ग रूग्णांचे प्रमाण वाढू नये, यासाठी नियमित तपासण्या करा.  सामाजिक संस्थांच्या मदतीने तपासण्या वाढवा. एडस रूग्णांवर योग्य उपचार करून औषधे कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. रूग्णांना असलेल्या सोयी-सुविधा देण्यावर भर द्या.एचआयव्ही संसर्ग बालकांना प्रोटीनयुक्त सकस आहाराची गरज आहे. निधीअभावी आहार मिळत नसल्याची बाब निदर्शनाला आल्यानंतर श्री. शंभरकर यांनी तत्काळ दखल घेत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.

बालकांच्या आहारासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गरोदर महिलेची एचआयव्ही तपासणी केली जाते. गरोदर महिला एडसग्रस्त आहे हे निदर्शनाला आले तर तिच्यावर त्वरित उपचार सुरू केले जातात. यामुळे बाळाला धोका पोहोचण्याचे प्रमाण कमी होते.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रेशन कार्ड मिळवून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यांची जुनी रेशनकार्ड जमा करून अंत्योदय योजनेतील कार्ड देण्यासाठी शिबीर आयोजित करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या. तसेच त्यांना अन्य व्यवसायासाठी प्रशिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. अनेक कुटुंबे शासकीय लाभापासून दूर आहेत. सामाजिक संस्थांनी शासकीय यंत्रणांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी. सामाजिक संस्थांनी मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड यापासून वंचित राहिलेल्यांना लाभ मिळण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | रणजित डिसले गुरुजींना 3 वर्षाचा पगार दिलाच कसा | परितेवाडीच्या मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

Next Post

सोलापूर : अध्यक्षांना सदस्यांनी घेरले, अध्यक्ष मागच्या दरवाज्याने जीबीला जॉईन | “ए अरुण तुझा गट नगरपंचायत झालाय तू गप्प बस” काय झाला गोंधळ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : अध्यक्षांना सदस्यांनी घेरले, अध्यक्ष मागच्या दरवाज्याने जीबीला जॉईन | "ए अरुण तुझा गट नगरपंचायत झालाय तू गप्प बस" काय झाला गोंधळ

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986435
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group