सोलापूर : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याला येत्या 11 फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
◆ राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात 👇👇👇👇👇👇👇👇
२५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयोगाच्या दि. ०२/०२/२०२२ च्या पत्रान्वये आपणांस सूचना देण्यात आल्या आहेत. २. सदरचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात सकाळी १०.३० वाजता उपस्थित रहावे. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी आयोगाचे दि.०४/१०/२०११ च्या आदेशासोबतचे प्रपत्र – १, प्रपत्र – ३, प्रपत्र – ४, प्रपत्र – ६ व प्रपत्र – ७ मधील माहिती (हार्ड तसेच सॉफ्ट कापी Excel Formatसह) तसेच नकाशे इ. कागदपत्रे आणावीत.















