सोलापूर जिल्हयात ११ तालुक्यात पंचायत समिती मार्फत घरकुल लाभार्थ्यांना घरकुल कसे असावे याची प्रतिकृती प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी १० तालुक्यात घरकुल डेमो हाऊस बांधण्यात आलेले आहे. सदयस्थितीत जिल्हास्तरावर डेमो घरकुल मंजूर झालेले असून त्याच्या बांधकामासाठी अध्यक्ष कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या उपस्थितीत डेमो हाऊसच्या घरकुलाचे भुमिपुजन पार पडले. घरकुल बांधल्यावर घरकुल लाभार्थ्यांना त्याचा स्वत:चे घरकुल बांधण्याकरीता मार्गदर्शक लाभ होणार आहे.
■ घरकुलाच्या वैशिष्टपुर्ण बाबी अशा असतील
२. पर्यावरण पुरक बांधकाम आहे. यात लाकडाचा वापर केलेला नाही.
३. लोखंडी खिडक्या व दरवाज्यांचा वापर करण्यात येणार आहे.
४. सेफ्टीक टँक ऐवजी शोष खड्डा करण्यात येणार आहे.
५. पारंपारीक मातीच्या विटा ऐवजी फ्लाय ऍश ब्रिक्स चा वापर करण्यात येणार आहे. ६. रूफ वॉटर हॉरवेस्टींग करण्यात येणार आहे.
७. परीसर सुधारणा व नाविण्यपुर्ण रंगरंगोटी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे डेमो घरकुल पुर्ण झाल्यानंतर नाविण्यपुर्णतेचे घरकुल पाहण्याचा योग येणार आहे. असे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी या प्रसंगी सांगितले.















