सोलापूर : दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवरच्या सीना नदीवर असलेल्या कलकर्जाळ बंधाऱ्यावर पती पत्नी आणि त्यांची एक वर्षांची मुलगी तोल जाऊन पडली. यानंतर बंधाऱ्यात पडलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं.नवरा वाचला, मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र पत्नी बुडाली ती सापडली नाही. सुमारे 10 ते 12 तासाच्या शोधकार्यानंतर अखेर महिलेचा मृतदेह सापडला. पत्नी सुप्रिया माळगे असे त्या महिलेचे नाव आहे. पहा हा व्हिडीओ…















