सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीनुसार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मान्यतेने सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिटणीस पदी संगिता जोगधनकर यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी या निवडीचे पत्र सात रस्ता येथिल “जनवात्सल्य” निवासस्थानी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान केले. सोलापूर शहरात महिला काँग्रेसचे संघटन बळकट करून काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचा मनोदय संगीता जोगदधकर यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती बद्दल संगिता जोगधनकर यांचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. संगीता जोगदधकर यांच्या रूपात सोलापूर शहर महिला काँग्रेसला एक नवा चेहरा मिळाला असल्याने महिला कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. सरचिटणीस पदी निवड झाल्या नंतर लगेच त्यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम घेऊन आपली निवड सार्थ करून दाखवली.
















