सोलापूर : कर्नाटक सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींना हिजाब बंदी केली आहे., या निर्णयाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील एमआयएम पक्षाने या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपोषण गेट समोर पोलिसांचा सकाळपासूनच मोठा बंदोबस्त होता कार्यकर्ते जमले तेव्हा पोलिसांनी हाकलून लावले होते मात्र शेवटी महिला जिल्हाध्यक्षा रेशमा मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील निषेधार्थ मोर्चा काढून कर्नाटक सरकार आणि भारतीय जनता पार्टीचा निषेध नोंदविण्यात आला.
कर्नाटक मधील भारतीय जनता पार्टीचे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात काम करत आहे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देतात मात्र दुसरीकडे त्याच मुलींना शिकू दिले जात नाही. आम्ही ‘हिजाब’ मध्ये सुरक्षित आहोत, आम्हाला कंफर्टेबल वाटते मग हा निर्णय का? जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टारगेट केले जात असल्याचा आरोप रेश्मा मुल्ला यांनी यावेळी केला…
या आंदोलनानंतर केवळ महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले काही महिला आंदोलनानंतर जात होत्या त्यांनाही पोलिसांनी धरून गाडीत कोंबले…
या आंदोलनात रेश्मा मुल्ला, सलमा सय्यद, नसीमा कुरेशी, नगरसेविका वाहिदा भंडाले, नगरसेवक गाझी जहागीरदार, नगरसेवक अजहर हुंडेकरी दौला कुमठे, नसीम खलिफा, कमरुल शेख यांच्यासह कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते















