सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा चार फेब्रुवारी रोजी संपन्न झाले मात्र या सभेपूर्वी सर्व सदस्यांनी ही सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावी अशी मागणी केली होती त्यासाठी सर्व सदस्य अध्यक्षांसह जिल्हाधिकारी यांना भेटले होते मात्र त्यांनी ही परवानगी दिली नाही शेवटी ही सभा ऑनलाईन झाली ऐनवेळी तहकूब करण्यात आली.
दरम्यान मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुमारे दीडशे ते दोनशे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ऑफलाईन सभेला परवानगी दिली नाही सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते यावर जिल्हा परिषदेचे आक्रमक सदस्य सुभाष माने यांनी तोफ डागली आहे ऑफलाइन सभेला परवानगी नाही मग सभागृहात दीडशे ते दोनशे लोक कशी बोलावली? जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासनावर फौजदारी दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
















