Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शर्म करो मोदी, शर्म करो..,कोरोनाच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर का? महाराष्ट्राची माफी मागा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना कोरोना काळातील आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडत कोरोना वाढीस महाराष्ट्र जबाबदार आहे असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला. यांच्या निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने  कॉंग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेत्रत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, मोदी सरकार शर्म करो, असे जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाववाढीच्या सुरुवातीला प्रचारजीवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोक, त्यात हजारो परदेशी लोक जमवून नमस्ते ट्रम्प कार्यक्रम केला तिथूनच भारतात कोरोना वाढला, मोदी आणि भाजपच्या वतीने याच काळात मध्यप्रदेशात सत्तापालट खेळ खेळला गेला. बिहार व इतर राज्यात मोठमोठ्या रॅली व प्रचार सभा घेण्यात आल्या. राहुल गांधींनी कोरोना अति धोकादायक आहे उपाययोजना करा म्हणून सांगितले पण त्यावेळी भाजप नेत्यांकडून त्यांची चेष्टा करण्यात आली मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे काळजी न घेतल्यामुळे लाखो लोकांच्या मृत्यू कोरोनामुळे झाला, अनेक मुले अनाथ झाले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक रॅमिडिसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन कमि प्रमाणात देण्यात आला. कोरोना वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी दिवे लावण्याचा, टाळ्या वाजविण्याचा, थाळी वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यामुळे सारा देश गर्दी करत रस्त्यावर आणला, अचानक लोकडाऊन केल्यामुळे मजुरांचे हाल झाले उपासमार झाली. पायी आपल्या गावी चालत निघाले. मुंबईतील बांद्रा मध्ये रेल्वे सुरू करून उत्तर प्रदेश जाण्याची मागणी करून भाजपनेत्यांनी हजारो कामगारांची गर्दी जमविली यामुळे कोरोना वाढला याचे मोदी आणि भाजपवाल्यानी आत्मपरीक्षण केले पाहिजे याउलट महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्थलांतरित मजुरांना, नागरिकांना रेल्वे तिकीट, जेवण व इतर प्रकारे मदत करत होते तेव्हा भाजपवाले पीएम केयर फंडसाठी पैसे मागत होते हा इतिहास कोणीही विसरणार नाही पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. ते नेहमीच महाराष्ट्राचा तिरस्कार करतात. मोदीजी आपण सात वर्षे सत्तेवर आहात, रेल्वे तुमच्या अखत्यारीत आहे. विमानतळ बंद केले नाही याउलट कोरोना वाढीस महाराष्ट्र कारणीभूत आहे असे संसदेत आरोप करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल मोदींनी माफी मागावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक विनोद भोसले,  दक्षिण सोलापूर अध्यक्ष हरीश पाटील, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, लक्ष्मीकांत साका, फ्रंटल अध्यक्ष गणेश डोंगरे, भिमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सायमन गट्टू, पशुपती माशाळ, आंबदास गुत्तीकोंडा, आझम सैफन, अनिल मस्के, VD गायकवाड, राजन कामत,  हसीब नदाफ, नागनाथ कदम, सिद्राम आनंदकर, विवेक कन्ना, सुनील व्हटकर, राहुल बोळकोटे, सागर शहा, अनुपम शहा, नागनाथ कोप्पा, समीर काझी, सहदेव इप्पलपल्ली, भिमाशंकर जमादार, मल्लेशी बिडवे, अंजली मंगोडेकर, रशीद शेख, विनोद रणसुरे, सुभाष वाघमारे, प्रमिला तुपलवंडे, मोनिका सरकार, बसंती साळुंखे, सुरेखा घाडगे, रुकैया बिराजदार, चंदा काळे, मुमताज तांबोळी, चंदप्पा क्षेत्री, स्नेहल शिंदे, नागनाथ बंगाळे, सुनीता शेरखाने, मीना गायकवाड, युनूस शेख, कांतीलाल धोत्रे, पप्पू गारे, सलीमा शेख, दत्ता नामकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सुभाष माने बरसले..,जिल्हा परिषद अध्यक्ष व प्रशासनावर फौजदारी करा…

Next Post

सुभाष देशमुखांच्या विचारधारेची ‘किव’येते ; काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंहाचे बापूना उत्तर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुभाष देशमुखांच्या विचारधारेची 'किव'येते ; काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंहाचे बापूना उत्तर

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986461
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group