सोलापूर :महानगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेमध्ये सत्तेचे स्वप्न महेश कोठे यांच्या आडून बघितले जात आहे गुरुवारी राष्ट्रवादीचे शहर समन्वयक शेखर माने सोलापूर दौर्यावर होते यांच्या उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या सुभद्राई कार्यालय मध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नगरसेवक पदाधिकारी नव्याने येणारे महेश कोठे, आनंद चंदनशिवे,तौफिक शेख उपस्थित होते.
यावेळी याच भागातील एका नगरसेवकाने महेश कोठे यांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली प्रभाग रचना वरून हा वाद झाला. त्याच वेळी महेश कोठे यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले ते लगेच खाली बसले त्यांना त्वरित सगळ्यांनी शेजारीच असलेल्या गंगामाई हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोठे यांना मार्कंडेय रुग्णालयात दाखल केले. महेश कोठे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
त्यांना यापूर्वी अँजिओग्राफी करण्यात आली होती त्यामुळे त्यांना गोळी चालू आहे त्याची गोळी चुकली असल्याने त्यांना अस्वस्थ होऊ लागले म्हणून त्रास झाला, शेवटी ते सुरक्षित आहेत. समन्वयक शेखर माने तसेच कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी तातडीने महेश कोठे यांच्यावर उपचार केले, महेश कोठे यांना भेटण्यासाठी सर्वच नेते मार्कंडेय रुग्णालयांमध्ये गेले होते परंतु त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजले, सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला, महेश कोठे यांचे कुटुंबीय नगरसेवक प्रथमेश कोठे, यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे सर्व सध्या मार्कंडेय रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यामुळे कोठे यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे ते सुरक्षित आहेत असे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान स्वतः महेश कोठे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे सतत प्रवास केल्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले मी सध्या सुरक्षित आहे. महेश कोठे काय म्हणाले पहा हा व्हिडिओ














