सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सुवर्णा झाडे – खेलबुडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मार्डी येथे नागनाथ मंदिरात सुवर्णराज महिला मंडळ च्या प्रीती झाडे, आरती झाडे यांच्या वतीने व प्रमुख हस्ते हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला महिला उद्योजिकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती मंगल कोल्हे, लता फुटाणे, सुवर्णा शिवपुरे, लता ढेरे, देवता माळी, श्रद्धा मार्तंडे, वृषाली पवार, दापटे ताई, अपर्णा देशमुख, नंदिनी सकट आदी आजी माजी पदाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
महिलांना व्यवसायाची संधी व महिलांना घरबसल्या काम कसे मिळेल ह्यसाठी कोल्हे यांनी खूप उत्साहवर्धक प्रेरणा दिली व महिलांना फ्री ट्रेनिग देणार असे सांगितले. तसेच शेकडो महिलांच्या उपस्थित सुवर्णा झाडे यांच्या कामाची प्रशंसा केली. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड यांचे महिला संघटन कार्याने प्रेरित होऊन निरीक्षक दीपाली पांढरे तसेच जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या बहुमोल मार्गदर्शनात महिला जिल्हाध्यक्षा यांच्या उपस्थितीत लवकरच अजून 4 गावामध्ये असा कार्यक्रम करणार असल्याचे सुवर्णा झाडे यांनी सांगितले.
आयोजिकांनी उपस्थितांचे आभार मानून आलेल्या सर्व मान्यवर महिला गावकरी महिलांना हळदी कुंकू लावून वाण दिले. त्याच बरोबर सेवालाल नगर लमाण तांडा ह्या नावाने ओळखली जाणारी वस्ती येथेही सुवर्णा झाडे यांनी लमाण संस्कृति मध्ये मिसळून हळदीकुंकू निमित्त सर्व महिलांना वाण देऊन कार्यक्रम साजरा केला.














