मोहोळ : खेळत खेळत पाझर तलावाकडे गेलेल्या चार वर्षीय बालकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 12 फेब्रुवारी रोजी घडली. आई सोबत मामाकडे राहायला आल्यानंतर ही घटना दुपारी दोनच्या सुमारास एकुरके येथे घडली. कुणाल कुंदन मोरे असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकुरके येथील अरविंद भारत जौजट यांची बहीण प्रियांका मोरे मूळ रा. मोडनिंब ही तिच्या पती व तीन मुलांसह एक महिन्यापासून कामानिमित्त एकुरके येथे भावाकडे राहण्यास आली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान भाचा कुणाल हा त्याचा घरासमोरील पाझर तलावाजवळ खेळत असताना पाय घसरून अचानक तलावात पडला व त्यातच बुडून त्याचा मृत्यू झाला. याची खबर अरविंद जौजट यांनी देण्यात आली.
याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार गणेश पोपळे अधिक तपास करत आहेत.
















