सोलापूर : शिंदी पिऊन दोन इसमांनी घरासमोर उलट्या केल्या. त्यांना तुम्ही माझ्या घरासमोर उलट्या का केल्यात याचा जाब विचारला, उलट दुकानदाराने त्या विचारणाऱ्यांना मारहाण केल्याची घटना साईबाबा चौक गणेश मंदिरासमोर घडली.
या प्रकरणात १) संदिप बंदपट्टे, २) शोभा बंदपट्टे, ३) अबु बंदपट्टे, ४) शिवा बंदपट्टे, ५) अम्मी बंदपट्टे, ६)लक्ष्मी बंदपट्टे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल विठ्ठल जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडे सात वाजता फिर्यादीच्या राहते घरासमोर घडली.
फिर्यादी व तिची भाच्ची राजश्री साळुंखे व भाऊ बाशा जाधव, वहिणी संगीता जाधव असे मिळून घराच्या बाहेरील कट्टयावर बसले असताना त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी सिंदी पिवून येवून उलटया केल्या, तेव्हा फिर्यादीने त्यांना तु माझ्या घरासमोर का उलटया केल्या असे म्हणाले असता त्या दोन इसमांनी शिंदी विक्रेत्यांना जावून सांगितले तेव्हा बंदपट्टे ग्रुपने फिर्यादीस तुम्ही माझ्या गि-हाईकाला का शिवीगाळ केली या कारणावरून सर्वानी मिळून शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्याने लाकडाने, प्लॅस्टीकच्या खुर्चीचे मारहाण करून भावास वहिणी यांना मारून किरकोळ जखमी करून मुक्का मार लागलेला आहे. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चव्हाण तपास करत आहेत.


















