सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, किशोर पाटील, सुनील पाटील, सुरेश पाटील, सुनील भोसले, नागनाथ क्षीरसागर, मदन क्षीरसागर यांच्यासह बाळे परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी स्टेजवर शहराध्यक्ष भारत जाधव, जिल्हा शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, मनोहर सपाटे, महेश कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

















