सोलापूर : गली गली मे शोर है, नवाब मलिक चोर है, देश का गद्दार कौन है, नवाब मलिक….नवाब मलिक…, राजीनामा द्या, राजीनामा द्या, नवाब मलिक राजीनामा द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या नवाब मलिक यांचा निषेध असो अशा घोषणाबाजीने भारतीय जनता पार्टीने लक्ष वेधून घेतले. इडिने बुधवारी दिवसभर नवाब मलिक यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यंनम, सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्यासह नगरसेवक विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली
आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री भ्रष्टाचाराने माखले आहेत, त्यामध्ये नवाब मलिक हे देशद्रोही आहेत, 1992 च्या बॉम्बस्फोट मध्ये आतंकवाद्यांना साहित्य पुरवण्याचे काम नवाब मलिक यांनी केले आहे, भारता विरोधात कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांना नवाब मलिक हे फंडिंग करतात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
या निदर्शने आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

















