Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur | राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; महेश कोठे शांत का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेची न्यु बुधवार पेठेतील जुन्या बस डेपोची १० गुंठे जागा आयएमसी कंपनीला सीएनजी पंपासाठी देण्याचा विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बरीच खडाजंगी झाली. विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. चंदनशिवे यांच्यावर अमोल शिंदे यांनी तोफ डागत आता निवडणुकीच्या तोंडावरच या भागातील लोकांचा एवढा कळवळा का? असा सवाल करत चंदनशिवे यांच्यावर तोंडसुख घेतले.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संभाव्य नेत्यांमध्ये सभागृहात जुंपली असताना महेश कोठे यांनी मात्र बघ्याची भूमिका घेत वादाचा आनंद घेतला. सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. न्यू बुधवार पेठेतील जुन्या बस डेपोची एक एकर जागा आयएमसी कंपनीला भाड्याने देण्याचा ठराव २०१८ मध्येच झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडलेली उर्वरित १० गुंठे जागा त्या कंपनीला देण्याचा प्रस्ताव सभेच्या अजेंड्यावर होता.

न्यु बुधवार पेठेत लोकवस्ती आहे. याच भागात सीएनजी पंप करणे धोक्याचे आहे, असे म्हणत घटनेचा आनंद चंदनशिवे आणि सुरेश पाटील यांनी विरोध दर्शविला. लोकांचा जीव धोक्यात घालून पंप उभारणार का, असा प्रश्न विचारत चंदनशिवे यांनी आणखी एक उपसूचना मांडली. मात्र यापूर्वीच या कंपनीला एक एकर जागा देण्याचा ठराव झाला आहे. आता केवळ दहा गुंठे जागा देण्याचा विषय आहे. आपल्या माहितीनुसार सीएनजी  धोक्याचे नाही. त्यामुळे या प्रस्तावाला विरोध होऊ नये अशी भूमिका विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांनी मांडली.

महापौरांनी आनंद चंदनशिवे यांची उपसूचना फेटाळली. भाजप आणि शिवसेनेचा या कामाचा रंग मला समजला, असे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले. आमचा रंग समजला. तुमचा कोणता आहे? असे विरोधीपक्षनेते अमोल शिंदे यांनी विचारले. बराच वेळ खडाजंगी झाली. 

अखेर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची उपसूचना फेटाळली. विरोधी पक्षनेते यांची उपसूचना मान्य करून प्रस्ताव मंजूर केला. आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला असला तरी अधिकृत प्रवेश झालेला नाही. महेश कोठे यांच्यावर महापालिकेची संपूर्ण जबाबदारी दिली आहे, त्यांचा ही अद्याप प्रवेश झालेला नाही. कोठे सोबत विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. प्रभाग रचनेवरून महेश कोठे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेत्यांचा राग आहे.

भारत जाधव यांच्या मंगल कार्यालयात प्रभाग रचनेवरून चांगलाच वाद झाला, गटनेते किसन जाधव यांनी कोठे यांना चांगलेच फैलावर घेतले, चंदनशिवे व तौफिक शेख यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कोठेंना थेट हॉस्पिटलमध्ये जावे लागले. किसन जाधव, आनंद चंदनशिवे ही मंडळी महेश कोठे यांच्याशी जास्त जुळवून घेत नसल्याचे बोलले जाते. अमोल शिंदे मात्र कट्टर कोठे समर्थक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जी अंतर्गत धुसफूस सुरू आहे त्याचेच तर  पडसाद महापालिका सभेत उमटले नसतील ना ? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

तब्बल 10 लाखाची आहे ही कुक्कुटपालन योजना ; त्वरित अर्ज करा, मार्च महिन्यात ही आहे शेवटची तारीख

Next Post

भाजप आ. विजयकुमार देशमुख निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी समोर ; थेट केला हा आरोप | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजप आ. विजयकुमार देशमुख निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी समोर ; थेट केला हा आरोप | Solapur

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986464
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group