सोलापूर : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र काढले असून सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख आणि शहर अध्यक्ष विक्रम देशमुख या दोन प्रमुख नेत्यांवर दिले आहे. आमदार विजयकुमार देशमुख निवडणुकीचे प्रभारी असून शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना निवडणूक प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी निवड केली आहे. या निवडीचे सोलापूर शहरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वागत केले आहे. दरम्यान या निवडीनंतर बोलताना विजय देशमुख म्हणाले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेली जबाबदारी आपण सार्थ ठरवू, माझे सहकारी तथा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख तसेच शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या समन्वयाने महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणू असे सांगत मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहरात अनेक विकासाची कामे केली आहेत यंदाची निवडणूक की महाविकासआघाडी अर्थात तीन पक्षांच्या विरोधात आहे. तरीही आम्ही पुन्हा महापालिकेत सत्ता राखण्यात यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काय म्हणाले, देशमुख….
















