सोलापूर : भाजप नेत्यांच्या विरोधात पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिले असल्याचा दावा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सरकार मार्फत चौकशी करावी त्यांना कुणी अडवले का असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ह्यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यानी राज्यभर विविध मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन मलिकांच्या अटकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केलाय.
मुंबई बॉम्बस्फोटात मुख्य आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिम यांच्याशी संबधीत असलेल्या लोकांशी मलिकानी ठेऊन कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे,त्या गैरव्यवहारा त्यासंबंधात ईडीकडून चौकशी होत असेल आणि मलिक हे दोषी ठरणार असतील तर मग महाविकास आघाडीचे नेते मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलन का करत असा सवाल उपस्थित करत भाजपाच्या दरेकर पुढे बोलताना म्हणाले ,” महाविकास आघाडीतील नेते मंत्री नवाब मलिकांना देशभक्त ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्या अपेक्षित असताना महाविकास आघाडीतील नेते हे मलिकाचे जागतिकीकरण करण्यात व्यस्त आहेत संविधानिक पेच निर्माण होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा यापेक्षा उग्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी दिला.
यावेळी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर श्रीकांचना यंनम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहर चिटणीस शशी थोरात आदी उपस्थित होते.

















