सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी सोलापुर जिल्हा साठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्षवाढीचा उद्देश समोर ठेवून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस युवक कार्यकर्त्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा युवक अध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील जावेद पटेल यांची निवड करण्यात आली आहे. 2 महासचिव, 1 संघटक, 5 जिल्हा संघटक, 2 सचिव, 1 सहसचिव, 2 कोषाध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 3 सल्लागार, 1 प्रसिद्धी प्रमुख असा 20 जणांचा समावेश आहे.

















