सोलापुर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शासनदरबारी प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हातील १८५४ रेशन दुकानदारांचा गुरुवारी लक्षवेधी संप पुकारण्यात आला आहे. १)
शहरातील दुकान दराप्रमाणे तालुक्यातील दुकानदारांना देखील पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य माहे मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत कमिशन मिळावे.
२) NPH केसरी कार्डाचे गहू व तांदूळ माहे जूनचे धान्य न मिळाल्याने भरणा रक्कम परतावा मिळावे. …
ग्रामीण मधील रेशन दुकानदारांच्या या प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटक सर्व तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अध्यक्ष डी सी कटारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष मांगेराम जाठव, महाराष्ट्र सचिव बाबुराव म्हमाने, राज्य खजिनदार विजय गुप्ता पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे राज्य सदस्य चिंतामणी सोंडेकर यांच्यासह सोलापूर सातारा उस्मानाबाद सांगली या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत अशी माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी दिली.

















