सोलापूर : जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास समाजकल्याण सभापती संगीता धांडोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा परिषद पक्षनेते अण्णाराव बाराचारे, सदस्य रेखा गायकवाड, सदस्य शिवाजी सोनवणे, सदस्या सुनंदा फुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बालकल्याण विभागाचे प्रशासनाधिकारी चंद्रकांत होळकर, गिरीश जाधव मेहेरकर यांनी परिश्रम घेतले. दरम्यान सुनंदा फुले या भाषण करत असताना पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांनी फुले यांना मॅडम तुम्ही, पुढच्या वेळी सभागृहात अध्यक्ष म्हणून यावे असा शुभेच्छा दिल्या.पहा तो व्हिडीओ…
जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा देताना महिला कर्मचाऱ्यांचा कलागुणांचे कौतुक केले…

















