सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर तर्फे निवेदन अर्ज सादर करण्यात येते, नवाबमलिक यांना ईडी चौकशीच्या नावा खाली विनाकारण गुंतविण्याचा प्रयत्न चालू आहे. एखादा मुस्लिम नेता असला की, विनाकारण त्याचा नांव कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला जातो. अशा प्रकारामुळे अल्पसंख्याक समाजामध्ये भिती निमार्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून केंद्र सरकार हे महाराष्ट्रराज्या मध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. एखादा व्यक्ती सर्वाजनिक जिवनात प्रतिनिधीत्व करत असताना त्याला बदनाम करण्याचा षडयंत्र चालू आहे.
या प्रकरणात योग्यती चौकशी करुन नवाबमलिक यांना योग्यते न्याय देण्यात यावा आणि केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर थांबविण्यात यावा या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष फक्रुद्दीन शेख शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख एजाज शेख फारुख मटके नलिनी चंदेले राजू कुरेशी सायरा शेख यांच्यासह अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
















