सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले कार्याध्यक्ष लिंबराज जाधव सरचिटणीस संभाजी फुले, वीरभद्र यादवाड, सूर्यकांत हत्तुरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे कार्यालया बाहेर पडले असता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र स्वामी हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असल्याने त्यांनी चार वाजता भेटू असे सांगून ते गेले.
दरम्यान शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली, कोरोना काळात शाळा बंद मात्र शिक्षण चालू होते तसेच जिल्ह्यातील हजारो शाळा स्वच्छ व सुंदर झाल्या त्यामध्ये सुद्धा मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मोठा सहभाग होता. यावरच जिल्हा परिषदेचा राज्यभरात नावलौकिक झाला असे असताना शिक्षकांचे प्रश्न सोडवणे प्रशासनाची जबाबदारी आहे. शेकडो शिक्षकांच्या पदोन्नती राहिल्या आहेत असे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची अपेक्षा भरले यांनी व्यक्त केली…
या आहेत शिक्षक संघटनेच्या मागण्या..👇👇👇
1) शिक्षकांना विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती देणे.
2) आतिरिक्त समाजशास्त्र विषय शिक्षकाचे नकार मंजूर करून त्यांचे समायोजन करावे.
3) केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती देणे.
4) कन्नड शाळांचे मुख्याध्यापक पदे भरणे.
5) शिक्षकाचे वैद्यकीय बीले मंजूर करणे.
6) शिक्षकांचे वेतन वेळेवर देणे.
7) शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करणे.
8) पदोन्नती नंतर रिक्त होणारे सर्व उपशिक्षक पदे बदली पोर्टलला दाखविणे.
9) जिल्ह्यातील शिक्षकाचे सेवापुस्तक पडताळणी करणे.
















