सोलापूर जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण सभागृहात पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत सन 2020 ते 2021 चे अहवाल वाचन होते. यावेळी विभागीय उपायुक्त विजय मुळीक, विभागीय उपायुक्त राहुल साकोरे, विभागीय सहाय्यक आयुक्त हराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व सर्व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. सीईओ स्वामी यांचा ही सौरभ राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषदेत मागील वर्षभरात राबवलेले माझे गाव, कोरोनामुक्त गाव, स्वच्छ व सुंदर शाळा, माझे मूल माझी जबाबदारी, सायकल बँक, जन संजीवनी योजना, गीत गुंजन कार्यक्रम, माझी वसुंधरा अभियान, अशा विविध उपक्रमाची माहिती दिली.
बैठकीनंतर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी विभागीय आयुक्त राव यांचे स्वागत करत विविध विषयावर चर्चा केली.
तब्बल दीड तास चाललेल्या अहवाल वाचन बैठकीनंतर पुणे विभागात विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद गौरवास्पद आहे. सिईओ दिलीप स्वामी व त्यांच्या टीमने चांगली मेहनत घेतली आहे. असे गौरवोदगार विभागीय आयुक्त सौरव राव यांनी काढले.


















