सोलापूर : शहरातील वीज वितरणच्या जोडबसवण्णा चौक शाखेतील बाह्यस्रोत कर्मचारी प्रशांत प्रकाश गुंडला हा मागील सहा वर्षांपासून कामावर होता. DTC वरील थकबाकी व ग्राहकांच्या समस्येचे निराकरण करण्याचे काम गुंडला हा करीत होता. मात्र जोडबसवण्णा शाखेचे अभियंता जुबेर शेख यांनी अचानक कामावरून कमी केले. कारण नसताना व जाणीवपूर्वक त्रास देत शेख यांनी कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ प्रशांत गुंडला याने 1 एप्रिल पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला दिले आहे. दरम्यान गुंडला याने अधिक माहिती दिली….
















