सोलापूर : होळी सणाच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर १८ मार्च रोजी पहाटे गस्तीदरम्यान एका कंटेनरमधून गोवा राज्याच्या विदेशी दारुच्या ८९० पेट्या जप्त करुन एकूण ७५ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, होळी सणानिमित्य धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी मद्याची मागणी लक्षात घेता गोवा राज्यातून दारुची अवेधरीत्या वाहतूक होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली होती. सदर पथकाकडून कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कडक पहारा लावून गस्त घालण्यात येत होती.
दिनांक १८ मार्च रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे व दुय्यम निरिक्षक व २ अंकुश आवताडे यांच्या पथकाने जत सांगोला महामार्गावर सोनंद गावाच्या हरीत पहाटेच्या सुमारास गस्त घालत असतांना एका आयशर कंपनीच्या सहाचाकी कंटेनर क्र.MII-०४-GR-७२३७ मथुन गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारुच्या एकूण ८९० पंट्या जप्त केल्या. सदर वाहनात एड्रीयल क्लासिक व्हिस्किच्या ७५० मिली क्षमतेचे ३०० पेटया, रोयल स्टंग विदेशी दारुच्या १८० मिली क्षमतंच्या १०० पेटया, इंपेरियल ब्ल्यू विदेशी दारुच्या १८० मिली क्षमतेच्या २३२ पेटवा, मॅक्डोवेल नं १ व्हिस्की विदेशी दारुच्या १८० मिली क्षमतेच्या २५८ पेटा असा ६६ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला. तसंच २ जुने वापरतं मोबाईल व कंटेनर असा एकूण ७६ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केला.
कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले, वय ३९ वर्षे, रा. पांखरापूर ता. मोहोळ याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भोसले, बाळू भोसले, शेखर भोसले व कंटेनर मालकासह इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक ( अंमलबजावणी व दक्षता) उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे, दुय्यम निरिक्षक व २ अंकुश आवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. आर. होळकर, जवान वेळापूरे, पांढरे, कथं, चंतन कहनगुटी, सावंत, लुंगसे, जवान नि वाहन चालक डी. एम. वाघमारे, महिला जवान पी.बी. कुटे यांच्या पथकाने पार पाडली.


















