सोलापूर : सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल चौघांना पोलीस प्रशासनाने दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. चारही जण जेलरोड पोलिस ठाणे हद्दीतील आहेत. आकाश अनिल मुदगल वय 29 राहणार सिद्धेश्वर हाउसिंग सोसायटी, तानाजी हरिश्चंद्र चव्हाण वय 42 राहणार राहुल गांधी झोपडपट्टी, सद्दाम जाकीर नाईकवाडी वय 28 राहणार मुस्लिम पाछा पेठ, व सोहेल अफसर आडते वय 32 राहणार मुस्लिम पाछा पेठ अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या चौघांना पोलीस प्रशासनाने सोलापूर शहर व जिल्हा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या भागातून तडीपार केले आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर वैशाली कडुकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड यांनी हे आदेश काढले आहेत.

















